"PBP- शेअर मार्केटचे टॅक्सेशन" या कोर्समध्ये तुम्ही शिकणार आहात "शेअर मार्केटमधील टॅक्सेशन"! 


शेअर मार्केटमध्ये आपण जे व्यवहार करतो, त्यावर होणार्‍या नफ्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागतो. कोणत्या पद्धतीच्या व्यवहारांवर नेमका किती कर भरायचा याची ब्लु-प्रिंट तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे.


ऑनलाईन कोर्स असल्यामुळे यामध्ये जी लेक्चर्स आहेत ती तुम्हाला आजीवन कधीही पुन्हा पुन्हा बघता येतील.


हा कोर्स पूर्णतः ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार तुमच्या मोबाईल अथवा कॉम्प्युटरमध्ये हे प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी जागेचे, वेळेचे कोणतेही बंधन नाही.


आपण जे व्यवहार करतो त्यावर आपले करदायित्व किती आहे हे समजुन घेऊन व्यवहार करणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे हा कोर्स तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे.


यामध्ये काय काय शिकायला मिळेल-

नमस्कार, मी नीरज बोरगांवकर

गेली अनेक वर्षे मी शेअर बाजारात कार्यरत आहे. मी स्वत: एक गुंतवणूकदार आहे, तसेच मी मराठी माणसांना शेअर मार्केटबद्दल मार्गदर्शन करत असतो. हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवतो. तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर बाजारातल्या मोठ्या संधीची माहिती पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही घरबसल्या तुमच्या वेळेत हे कोर्सेस करू शकता.

या तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी खर्चामध्ये तुम्ही हे बहुमोल प्रशिक्षण घेऊ शकत आहात.